- अनिकेत अजित निकम न मस्कार! तुम्हा सर्वांना दिवाळी २०२० च्या आरोग्यमय शुभेच्छा! दिवाळीच्या किंवा तत्सम सणांच्या शुभेच्छा देताना आपण नेहमीच सुख समृद्धी लाभो वगैरे म्हणतो, पण आजची आपली सर्वांची कोविड २०१९ मुळे एकंदरीत परिस्थिती पाहता आरोग्यमय शुभेच्छा देणे किती गरजेचे आहे हे वेगळे सांगायला नको. आमचा कौटुंबिक व्यवसाय पर्यटनाचा असल्याने मी कायमच निरनिराळ्या ठिकाणी फिरतो आणि लोकांना नेहमी सुदृढ रहा. फिरत रहा असे सांगत असतो पण दुर्दैवाने आज तुम्हाला घरातच रहा असे नाईलाजाने सांगत आहे. डिसेंबर २०१९च्या अखेरीस मी, माझी पत्नी दी प्ती, मुलगा अद्वय आणि सासूबाई स्वतःच्या गाडीने ‘साम्राज्य’ पासून प्रवासास सुरुवात करून सोलापूर – कर्नूल - कडप्पा – तिरुपती - चेन्नई - पॉंडेचरी - मदुराई - रामेश्वर – उटी - म्हैसूर - हुबळी असा तब्बल चार हजार किलोमीटरचा प्रवास करून पुन्हा घरी आलो. २०२० हे वर्ष आमच्या स्वागतास सज्ज होतेच. प्रवासाच्या आठवणींमध्ये रमत रमत पुन्हा कामाला सुरुवात केली. आमचे ‘निकम टूर्सचे’ ऑफिस हे कर्वे पुतळा चौकात असल्या...
- शिल्पा येवलेकर क्या बात है क्या चीज़ है पैसा? पैसा पैसा करती है क्यूँ पैसे पे तू मरती है? क्या बात है क्या चीज़ है पैसा? ‘साम्राज्य’च्या दिवाळी अंकासाठी काय लिहावे या विचारात असतानाच रेडिओ वर “ क्या चीज़ है पैसा ” हे गाणे वाजू लागले तसे माझ्या विचारांचे चक्र देखील पैशाभोवती फिरू लागले. गाणे संपता संपताच पैसा हा लेखाचा विषय होऊ शकतो हे उमगले आणि छोटेखानी प्रमाणात का होईना मला देखील आर्किमिडीजचा ‘युरेका’ क्षण अनुभवता आला. समोर जेवणाचे ताट वाढले होते पण माझी गत आर्किमिडीज सारखीच झाली.. त्याला कपड्याचे भान राहिले नाही आणि मला जेवणाचे. मग काय क्षणाचीही दिरंगाई न करता कागद आणि पेन घेतलं आणि लेखन सुरू केलं. पैसा हा विषय तसा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आणि परिचयाचा आहे. त्याचे प्रत्येकाशी एक अतूट, घट्ट नाते आहे तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्त्वाचे स्थान देखील आहे. चांगले जगण्यासाठी पैसे आवश्यक हे रूढार्थाने एक प्रकारचे सत्यच झाले आहे. परंतु त्याविषयी नवे काय सांगावे असा प्रश्न मात्र अजिबातच पडला नाही. कोवळ्या, अजाणत्या वयातच “येरे येर...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा