वेलकम टू ‘साम्राज्य’

 - सौ. सीमा पेशवा




कोथरूडच्या पौड रस्त्यापाशी

म्हातोबा टेकडी घेऊनी उशाशी

बांधियेली पेठकरांनी नगरी खाशी

सर्वांचरणी अर्पण करिते हे पद्य

"वेलकम टू साम्राज्य!" ---- १


सहाशे बेचाळीस कुटुंबांची वस्ती

नाही नुसतीच दगड माती,

जिथे जपली जातात नाती

आनंदाचा किल्ला अभेद्य

घरकुल आमुचे साम्राज्य ---- २


बहरती सुंदर फुलांचे ताटवे

फुलपाखरे अन् पक्ष्यांचे थवे

मुलांनी खुशाल बागडावे

परिसर सारा निसर्गरम्य

हिरवाईने नटलेले साम्राज्य ---- ३


आजी - आजोबांचे निवांत कट्टे

जमलेले गप्पांचे अड्डे

प्रत्येकाचे प्रेमाचे घरटे

अनेक आठवणी हृद्य

सौभाग्यदायी आमचे साम्राज्य ---- ४


गजाननाचे आगमनास

ढोल ताशा पथक स्वागतास

पारितोषिकप्राप्त करिती आरास

सर्वांचे दैवत आराध्य

गणेश पूजनी रंगते साम्राज्य ---- ५


कोणा हाती अप्रतिम चित्रकला

कोणाचा आहे गाता गळा

कोणाचा लेखनाचा छंद आगळा

कोणी वाजवी सुरेल वाद्य

कलाकारांचे माहेर साम्राज्य ---- ६


सर्व कलांचा आविष्कार

"जल्लोष" करी साकार

लहान थोर आणि नोकरदार

गायन, नाटक असो वा नृत्य

कौतुक करिते सकल साम्राज्य ---- ७


दिवस असो वा रात्र

संकट येवो किंवा आजार

मदतीस सदा तत्पर शेजार

सुख आणि समाधानाचे सुराज्य

आपल्या सर्वांचे साम्राज्य ---- ८


ऊन - वारा - पावसाशी झुंजत

ताठ उभी हरेक इमारत

जसा आहे अखंड भारत

तसेच राहो अविभाज्य

एकीने नांदो हे साम्राज्य ---- ९


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

देणं कृतज्ञतेचं!

संस्कृत – समज आणि गैरसमज