-
सुधीर
परांजपे
अश्मयुगापासून
ते थेट आजच्या स्मार्ट युगापर्यंत अनेक पिढयांना आकर्षित करणारे
आणि अव्याहतपणे वाटचाल करणारे हे अभियांत्रिकी शास्त्र. आयफेल टॉवर, पिसाचा झुकता मनोरा,
ताज महाल, कुतुब मिनार अशा अनेक अद्भुत आणि विस्मयचकित करणाऱ्या
आविष्कारांचा तांत्रिक पाया
बनलेले असे हे विज्ञान. जोडणी, बांधणी, उभारणी, गतिमानता, ऊर्जा अशा एक ना अनेक,
मी तर म्हणेन जवळजवळ सगळ्याच गोष्टींची सांगड घालून मानवी आयुष्य समृद्ध बनविणारा असा
हा अभ्यास. म्हणजे अगदी घरातल्या मांडणीपासून रोजच्या वापरातल्या गोष्टी ते थेट अवकाशयान
असा एवढा मोठा आवाका असणारे आणि ह्या अभ्यासाचा आधार घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसणारे
असे हे मानवी जीवनाला ठरलेले वरदान आहे.
आपण
आता या अभियांत्रिकी अभ्यासाकडे रोजगारनिर्मिती, व्यवसाय किंवा नोकरी या दृष्टीकोनातून बघू या. मग आपल्याला असे लक्षात येते
की विविध मार्गांनी ह्या अभियांत्रिकीचा उपयोग आपल्या आयुष्याला दिशा द्यायच्या दृष्टीने
होऊ शकतो. छोटे किंवा लघुउद्योग, कुटिरोद्योग, सेवाक्षेत्र, वाहन
व्यवसाय, धातुकाम, खनिज व्यवसाय आणि अन्य कितीतरी व्यवसाय या अभियांत्रिकी शाखेसाठी
उपलब्ध आहेत. भारत सरकारने नव्याने सुरू केलेल्या कौशल्यवर्धन,
आत्मनिर्भर भारत, स्वदेशी ह्या सगळ्या योजनांमधून यंत्र अभियांत्रिकीला आणखी ताकद मिळाली
आहे. भारतामध्ये होणारी परदेशी गुंतवणूक आणि आयातीला निर्बंध घातल्यामुळे ह्या शाखेतील
तरुण वर्गाला संधीची अनेक दालने उपलब्ध झाली आहेत. संरक्षण क्षेत्र,
यांत्रिक अवजारे व त्यांचे सुटे भाग आता मोठ्या प्रमाणावर आपल्या देशांतर्गत सुविधांमधूनच
बनविण्याचा मानस आहे. त्यामुळे नोकरी करू इच्छिणाऱ्या किंवा स्वतःचे
कौशल्य वापरून आणि मिळणाऱ्या आर्थिक योजनांचा योग्य फायदा घेऊन
व्यवसाय करू इच्छिणार्यांसाठी उपजीविकेच्या, उत्कर्षाच्या
अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि होतच राहणार आहेत.
ह्या
अभियांत्रिकीच्या सुरुवातीच्या काळात थोडी अंगमेहनत पडते आणि त्यामुळे तरुणाई इतर व्हाइट कॉलर वाटणाऱ्या शाखांकडे वळतात पण कालांतराने असे लक्षात येते की शाश्वतीच्या
मार्गाने जाणे कधीही दूरगामी फायद्याचे ठरते.
माझे
असे आवाहन आहे, की तरुण पिढीने या अभियांत्रिकीचा जरूर विचार
करावा आणि आपले जीवन समृद्ध करतांनाच समाजासाठी आपल्या ज्ञानाचा
उपयोग जास्तीत जास्त करावा ही अपेक्षा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा