अविस्मरणीय भेट

 -      गौरी वखरे


टक टक टक.... ✊✊

मी: कोण आहे? 

 

टक टक टक. ✊✊

मी: अरे कोण आहे?

मी घड्याळात बघितलं... रात्रीचे तीन वाजले आहेत. अरे इतक्या अवेळी कोण बरं आलं असावं? अरे कोण आहे रे? बोलत का नाही? काय मजाक लावला आहे?

 

टक टक टक.. ✊✊

मी: आयला... चोर, डाकू, भूत, प्रेत??? राम राम राम.

“तुषार, अरे तुषार उठ. कोणीतरी दार वाजवत आहे या वेळी...उठ लवकर.”

घोरत घोरत या माणसाने कूस बदलली आणि परत गाढ झोपून गेला.

लकी मॅन!😕

 

टक टक टक

आता मात्र मला उठावं लागलं ...

घाबरत घाबरत दारापाशी गेले आणि कशीतरी हिंमत एकवटून जोरात प्रश्न केला: “कोण आहे इतक्या अपरात्री???”

पलीकडून आवाज आला...

“मी देव आहे. म्हणजे देव काका नाही. खरखुरा देव... परमेश्वर!” 

मी: काय? 😳 चूप बस आणि ताबडतोब निघ इथून. तुला माहित नसेल की मी कराटे Black Belt आहे. चल फुट... 💪💪💪

देव: हाहाहा दार उघड लवकर. आताच्या आता. मोठी आली कराटेवाली...

भीतीने थरथर कापत मी शेवटी दार उघडलेच. आणि काय आश्चर्य! 😱😱😱 माझ्यासमोर खरोखर माझा देव उभा होता. 🙏🙏🙏 विश्वासच बसत नव्हता. पण कसंतरी स्वतःला सांभाळत मी भानावर आले.

मी: देवा, म्हणजे तू खरोखर तर!!!

देव फक्त हसला.

देव: “मी तुला एक वरदान द्यायला आलो आहे. माग तुला काय हवे ते!!!!”

मी: हुर्यो... सही रे सही. 😃😃😃 देवा ऐक, माझी लेक भाजीच खात नाही रे. पोषण कसं होणार अशाने??? तिला जरा भाजी खायची बुद्धी दे रे बाबा. धाकटं कार्टं अजिबात अभ्यास करत नाही रे. त्याला अभ्यास करायची बुद्धी दे. नवरा बरा आहे तसा. पण जरा प्रेमळ असता तर बरं झाल असतं...

 

माझा देव माझ्याकडे नुसता हसत बघत होता. 😊😊😊

मी: आयला...... 😕😕😕 मी हे सगळं काय मागते आहे! प्रत्यक्ष परमेश्वर मला वरदान देतो आहे. मला काहीतरी छान मागितलं पाहिजे.

देव फक्त हसत होता. 😊😊😊

देव: “बरं ऐक. मी तुला एक हिंट देतो. तू असं काहीतरी माग जे तुला मिळालंच नाहीये. मी ते तुला लगेच देऊ करेन.”

मी: “हो, हो, आलं लक्षात. थांब हं देवा जरा विचार करते.” आणि मग मी विचार करायला लागले. 

देव माझ्याकडे बघून फक्त हसला आणि सोफ्यावर जाऊन आरामात बसला. 

मी विचार करू लागले. देवाने मला आधीच एक सुंदर आयुष्य प्रदान केले आहे. माझ्या डोक्यावर हक्काचं छप्पर आहे.  खायला सुग्रास चवीचं पोटभर अन्न आहे. माझ्याकडे गुणी मुलं आणि प्रेमळ पती आहे. माझ्या हाकेसरशी धावून येणारे मित्रमैत्रिणी आहेत. मदतीला येणारे आप्त आहेत. देवसुद्धा आहेच की. माझ्या आयुष्यातील प्रत्येक चढ उतार देवाच्या मदतीनेच तर पार झाला आहे. त्याने मला पडायच्या आधीच सावरले आहे. त्याने मला बुद्धी दिली आहे अन् संवेदनशील मन दिलं आहे. आता आणि काय मागू त्याच्याकडे??? तो तर प्रत्येक वळणावर माझ्या सोबत होता. मीच मूर्ख, त्याला ओळखलंच नाही. 

देव अजून सुद्धा माझ्याकडे हसून बघत होता. 😊😊😊

आता मी त्याच्याकडे हसून बघितलं...

मी: देवा मला काही नको. फक्त एक वचन दे की तू असाच माझ्या सोबत कायम असशील. 

मेरे लिये तुम हो इतना ही काफ़ी है.

तुम हो तो पुरा आकाश पंखों पर उठा कर उड लू...

देव: तथास्तु...

 

तो निघून गेला. मला संभ्रमात टाकून. त्याला एक प्रश्न विचारायचा राहिला. आता तो परत आला की नक्की विचारेन.....की बाबा तू आहेस तर जगात का रे इतकी दुःखं आहेत??? 😐😐😐

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

देणं कृतज्ञतेचं!

संस्कृत – समज आणि गैरसमज