माझे आई बाबा

 

-      सौ शिवानी तातावार

 

आई तुझी माया!

फिरत असतानाही उन्हात जाणवते तिची छाया!!

बाबा तुमची प्रीती!

बाहेरच्या जगात गेल्यावर कळली तिची महती!!

आई तुझे संस्कार!

वाटतो विश्वास आम्हाला सुखी करू आमचा संसार!! 

बाबा तुमची बुद्धिमत्ता!

कमी पडेल जीवन हे गिरवितांना तिचा कित्ता!!

आई-बाबा तुमचे प्रेम!

असू जीवनात कुठेही आम्ही ठेवेल ते आम्हाला क्षेम!!

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

देणं कृतज्ञतेचं!

संस्कृत – समज आणि गैरसमज