एक मोठं गाव
होतं. त्या गावात एक सरपंच होता. तो त्या गावांमध्ये असलेल्या सगळ्या लोकांना खूप
विचित्र प्रश्न विचारायचा पण कोणालाच त्या प्रश्नांचे उत्तर यायचे नाही. त्या
गावात एक नवीन कुटुंब राहायला आले होते. त्या कुटुंबामधला छोटा मुलगा खूप हुशार
होता. त्यादिवशी त्या सरपंचांनी त्यांना एक प्रश्न विचारला की आपल्या गावात किती
मुलं किंवा मुली आहेत हे मला सांगा. आणि त्यांनी दहा मिनिटांचा वेळ दिला. आता ते
गाव होतं मोठं आणि दहा मिनिटात एवढी सगळी मुलं-मुली मोजणे म्हणजे खूपच अवघड काम होतं.
एका माणसाने काही विचार न करता मोजायला सुरुवात केली पण त्याला त्याचंच कळू लागलं की हे
खूपच अवघड काम आहे. त्या नवीन कुटुंबामध्ये जो हुशार मुलगा होता त्याला एक युक्ती
सुचली. तो म्हणाला, “आपल्या गावात एकशे दहा मुलं आहेत.” सरपंच म्हणाले, “जर कमी मुलं
असतील तर?” तो म्हणाला, “तर ती सगळी
मुले आपल्या नातेवाईकांकडे राहायला गेली आहेत.” ते ऐकून सरपंच म्हणाले, “आणि जर जास्ती
मुलं असतील तर?” तो म्हणाला, “तर त्यांचे
नातेवाईक आपल्या गावात राहायला आले असावेत.” हे ऐकून ते सरपंच अगदी शांत झाले आणि
तेव्हापासून असे विचित्र प्रश्न विचारायचे त्यांनी थांबवले. सगळ्या गावकऱ्यांनी
सुटकेचा निःश्वास सोडला.
- काव्या ठेंगोडकर.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा