-
भक्ती भोरकर
स्वच्छंदी वेडी मी
आनंदी पक्षी मी
घरट्यातूनी
माझ्या
विश्व बघणारी
मी
कल्पनांची
राणी मी
सुंदरतेची खणी
मी
मलाच शोधताना
सापडलेली
मनभावन कहाणी
मी
शब्द मी
ताल मी
सूर मी नाद मी
स्वतःलाच स्वतः
घालणारी साद
मी
फुलपाखरू मी
गगनात भिरभिरणारी
मी
कोवळ्या
फुलातून
गंधही चोरणारी
मी
स्वप्न की भास हा
गरुड भरारी घेणार मी ??

आपला दिवाळी अंक निर्मितीच्या अखेरच्या टप्प्यावर असताना आमची सखी, या कवितेची
कवयित्री भक्ती भोरकर हिचे दिनांक ५ नोव्हेंबर २०२० या दिवशी अकस्मिक निधन झाले. भक्तीला
आमची विनम्र श्रद्धांजली!
- संपादक
🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा