- सारिका निटूरकर (कुलकर्णी)
“Less is more!” अर्थात मिनिमलिस्टिक किंवा किमान डिझाईन्स. आधुनिक काळात ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. पहिल्या काळात इंटिरीयर ही संकल्पना माहिती नव्हती. पण ८०च्या दशकानंतर हळुहळू ही संकल्पना लोकांना माहिती झाली. आणि आता तर ती गरज बनली आहे. आपल्या गरजा ओळखून अचूक ङिझाईन करून देणे हे सगळ्यात महत्वाचे. त्यासाठी आपल्या गृहिणीची आवडती जागा, आणि खूप वेळ ती गृहिणी ज्या जागेत घालवते, ती जागा म्हणजे तिचे स्वयंपाकघर. स्वयंपाकघरातील इंटिरीयर करताना तेथील अत्यावश्यक गोष्टींकडे लक्ष केंद्रित करायला हवे. असे केल्याने अनावश्यक गोष्टी बाहेर पडतील.
लहान
स्वयंपाकघरातील रचना ही प्रथम योग्य रंगसंगतीने होणे गरजेचे असते. अर्थात स्वयंपाकघरात
उजेड जास्त आहे की अंधार आहे हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. तसेच Kitchen dado साठी कोणत्या
रंगाचा वापर करणार आहे, त्यासाठी बाकी सामान ठेवण्याची जी कपाटं असतात
त्यांची रंगसंगती, तसेच भिंतीचा रंग यांचा विचार करण्याची गरज आहे. शिवाय आजकाल दोन, तीन रंगांचा वापर करून डिझाईन्स केली जातात, तर त्याठिकाणी तेवढया रंगांची गरज आहे का? याचा योग्य विचार करणं खूप
गरजेचं आहे. तसेच स्वयंपाकघरात खूप सारे ङबे न वापरता गरजेचे
सामान Pull out Trolley मध्ये ठेवू शकता. अशानी पसारा पण होत
नाही, आणि सामान जागच्या जागी मिळते. परत Trolley साठी खूप लॅमिनेटस्
आणि ङिझाईन्स आहेत. पण, मी
म्हटलं तसं स्वयंपाकघर कितपत लहान मोठे आहे, त्यावर ङिझाईन अवलंबून
असतं. आपल्याकडे भरमसाठ पैसा आहे, हवे ते विकत घेऊ शकता, असे म्हणून आपण निरुपयोगी वस्तूंचा भडिमार करण्यात काहीच अर्थ नाही.
स्वयंपाकघर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटके
राहण्यासाठी आवश्यक व महत्त्वाच्या वस्तूच तिथे
ठेवणे गरजेचे असते.
स्वयंपाकघराला
लागून Dry Balcony पण असते. तर ती विसरून
चालणार नाही. अशावेळी स्वयंपाकघर सुंदर आणि Dry Balcony कोरडी
ठेवून कसे चालेल? तिथे पण चांगली रंगसंगती करून, सुंदरसे Money plant किंवा कोणतेही
Miniature plant ठेवून त्याला आकर्षक करू शकतो.
सगळ्यात
शेवटी इंटिरीयर ङिझाईनिंगमधल्या खूप सार्या संकल्पना आहेत, तशीच मिनिमलिस्टिक हीसुद्धा
एक संकल्पना आहे. आणि ते आपल्याला अधिक
सुंदर बनवता येते, तेही हव्या त्या बजेट मध्ये.
खूप सुंदर आणि माहितीपूर्ण लेख..
उत्तर द्याहटवा