- सौ. मानसी मांडे “ सं स्कृत ” हा शब्दच मुळी आपल्यासाठी एखाद्या संग्राह्य चीजवस्तू सारखा आहे . म्हणजे काय तर संस्कृत म्हटलं की , आपल्यामध्ये एकदम अभिमानाची भावना जागृत होते , हे अतिशय सुंदर आणि अमूल्य आहे हे आपल्याला माहित असतं , पण शोकेसमध्ये एखादं सुबक घंगाळं ठेवावं तसं ! अमूल्य असेल तरीही कायम दुर्लक्षित किंवा रोजच्या जीवनात काहीच उपयोग नसणारं ! आज संस्कृतची अवस्थापण अशीच आहे . सणवार , एखाद्या धार्मिक कार्यक्रमाच्या वेळीच संस्कृतचा वापर होतो . आणि दहावीपर्यंत अधिक गुण मिळवून देणारा विषय म्हणून ! संस्कृत म्हणजे मंत्र , भगवद्गीता आणि देवः देवौ - यापुढे आपली गाडीच जात नाही . अगदीच नाही म्हणायला कोणीतरी कालिदासाच्या साहित्याबद्दल काहीतरी बोलते . संस्कृतची विद्यार्थिनी म्हणून या सर्व गोष्टी माझ्यासाठी खरंच खूप त्रासदायक आहेत . त्यामुळे कायमच संस्कृत सारख्या देवभाषेची ही अवस्था का व्हावी आणि ही अवस्था कशी बदलता येईल याविषयी बर्याचदा स्वतःशीच विचारमंथन सुरू असते , बरेचदा सहाध्यायी , मित्र-मैत्रिणी , विद्यार्थी यांच्याशी बोलून हे कोडे ...
Wah Mohan 👌👌
उत्तर द्याहटवा