गेट वेल सून!

 – डॉ. दिपाली जोशी 

   एक छोटीशी आठवण. अनुभव. फक्त तीन शब्द. म्हटले तर साधे सोपे सरळ, पण खूप काही सांगून जाणारे. वाचणार्‍याच्या चेहर्‍यावर मंद हस्य आणणारे. आशा दाखवणारे. दिलासा देणारे. रात्र कितीही काळी असली, तरीही प्रसन्न आणि तेजस्वी किरणे सकाळी पडणारच याची आठवण करून देणारे. “हिंमत ठेवा. धैर्याने सामोरे जा. संकटं आली तरीही डगमगू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. अजून पुढे खूप काही तुमच्यासाठी वाट बघत आहे. ही वेळ कदाचित थोडी कठीण असेल पण हेही दिवस जातील.” हे सांगणारे. परत एकदा उमेदीने उभे रहा. हे सांगणारे ते तीन शब्द.

  “लवकर बरे व्हा! गेट वेल सून!”

 छोटेसे वाक्य पण खूप काही सांगून जाते. असाच एक अनुभव आला जेव्हा माझे एक नातेवाईक हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते आणि स्टाफतर्फे एक सदिच्छा कार्ड (गेट वेल सून) प्रत्येक रुग्णाला देण्यात आले. आजच्या ह्या ‘इलेक्ट्रॉनिक' युगामध्ये स्वतःच्या हाताने रेखाटलेले ते कार्ड. कोणीतरी कोणासाठीतरी बनवून ठेवलेले. सदिच्छा पोहोचवणारे. सध्याच्या ह्या काळात  अशा सदिच्छांची खूप गरज आहे. आपणही सर्वांनी रुग्णांसाठी, पीडितांसाठी घरबसल्या गेट वेल सून म्हणू या!   प्रार्थना करू या. औषधपाण्याबरोबर याचीही गरज आहे. सदिच्छा!!!



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

देणं कृतज्ञतेचं!

संस्कृत – समज आणि गैरसमज