सखी

 

शेखर एरंडे

 

हवी एक तरी अशी सखी

जिला सगळं सांगता येईल ।।१।।

 

हवी एक तरी अशी सखी

जी तुमची सख्खी असेल ।।२।।

 

हवी एक तरी अशी सखी

जिच्या हसण्यामुळे फुले पडतील

जिच्या बोलण्यानं मोती पडतील ।।३।।

 

हवी एक तरी अशी सखी

जिच्या लाजण्याने आनंदाला बहर येईल

जिच्या रुसण्याने आकाशात मळभ दाटेल

हवी एक तरी अशी सखी ।।४।।

 

कुठे भेटेल अशी सखी ?

शोधत आहे मी या जगी

तुम्हाला भेटली तर सांगाल का तिला

ती आहे माझ्या मनी ।।५।।

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

देणं कृतज्ञतेचं!

संस्कृत – समज आणि गैरसमज