- अमोल देशमुख
माझा
विश्वासच बसत नव्हता जे मी ऐकलं त्यावर, कारण डॉक्टरांनी ब्लडप्रेशर आहे असं
सांगितलं होतं आणि ते आटोक्यात आणायला मला औषध घ्यायला लागणार. वयाच्या ३६व्या
वर्षी मला ब्लडप्रेशरच्या गोळ्या घ्याव्या होणार होत्या.
आपण
सगळेच असा विचार करत असतो की "आपल्याला काय होतंय",
"मला काय होणार", "डॉक्टरला
काय कळतं", वगैरे वगैरे. पण माझ्या बाबतीत थोडं वेगळं
घडलं होतं, माझा मॅनेजर त्याच्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी
हार्टअटॅकने गेला, त्याला कसलाही त्रास नव्हता, उत्तम आरोग्य, रेग्युलर चेकअप, संपूर्ण काळजी घेणारा, तरीही अचानक एक दिवस सकाळी न्याहारीच्या आधी हार्टॲटॅकने गेला.
मी ठरवलं आपल्या बाबतीत असं घडता कामा नये म्हणून नियमित व्यायाम करायचा. डॉक्टरांनी सुद्धा विचारलं होतं औषध घेणार की व्यायाम करणार, मी क्षणात उत्तर दिलं, "व्यायाम करणार, डॉक्टर".
पहिली मॅरेथॉन
अतिशय
आळशी आणि स्वतःच्या तब्येतीबद्दल निष्काळजीपणाने वागणारा हाफ मॅरेथॉनला रजिस्टर
करून बसला होता. अहो, एक मिनिट पण ट्रेडमिलवर
पळता येत नव्हतं मला, पण २१ किलोमीटर पळणार हे ठरवलं होतं.
तीन महिने प्रॅक्टिस केली आणि पहिली हाफ मॅरेथॉन तीन तास पाच मिनिटात पूर्ण केली.
मित्रांनी आणि परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी खूप कौतुक केलं. त्या दिवशी मनोज,
माझा मॅनेजर हे बघायला नव्हता. पहिलं श्रेय त्याला द्यायला हवं कारण
त्यानेच मला प्रेरित केलं होतं पण ते बघायला तो जिवंत नव्हता. खूप आठवण आली मनोजची,
मनातल्या मनात त्याचं स्मरण केलं, ही २१ किलोमीटरची
रेस त्याला समर्पित केली आणि बालेवाडी स्टेडियमहून घरी परतलो.
सुरुवातीला
वजन कमी करणे खूप जड जात होते आणि त्यातच साम्राज्यमधल्या रक्तदान शिबिरात
डॉक्टरांनी ब्लड प्रेशर जास्त असल्यामुळे रक्तदान करू दिले नव्हते. अशा खचलेल्या
मनस्थितीत असताना डॉक्टरांनी मला सहा महिन्यांचा आराखडा दिला. मी तर शपथच घेतली
होती काहीही झालं तरी बीपीच्या गोळ्या सोडणारच. एका जवळच्या मित्राने,
ऋजुता दिवेकर आणि तिच्या डाएट प्लॅनबद्दल मला अवगत करून दिले.
नियमित व्यायाम आणि डायट यांचा फायदा झाला आणि मी दोन महिन्यात सात किलो वजन कमी
केले.
क्रीडाप्रकार
म्हटलं की दुखापत ही आलीच. सातारा मॅरेथॉनसाठी ट्रेनिंग घेताना,
माझ्या गुडघ्याला दुखापत झाली. मला एक किलोमीटर पण चालणे अशक्य झाले
होते. आणि सातारा मॅरेथॉन ही भारतातली सगळ्यात कठीण अशी मॅरेथॉन समजली जाते.
मित्रांच्या सल्ल्यानुसार मी मॅरॅथॉनमध्ये भाग न घेता, रीतसर
ट्रेनिंग घ्यायचे ठरवले. एका मित्राने कोथरूड डेक्कन रनिंग ग्रुपची ओळख करून दिली
आणि मी मुखर्जी गार्डनला नियमित त्यांचे सेशन्स अटेंड करू लागलो. या ग्रुपच्या
ट्रेनर्सचा विशेष उल्लेख करावासा वाटतो, कारण त्यांच्या नि:स्वार्थ
योगदानामुळे मी लवकर बरा झालो आणि त्यांच्या सहवासात रीतसर व्यायाम करायच्या पद्धती
शिकलो.
![]() |
रनिंग ग्रुपची सुरुवात |
![]() |
| साम्राज्य मॅरेथॉन |
माझी
लोकांना प्रेरित करायची सवय ही साम्राज्य जेष्ठ नागरिक मंचाच्या सदस्यांनी ओळखली
आणि कौतुकाची थाप सत्काररूपाने पाठीवर दिली. त्याच दिवशी मी माझी दुसरी हाफ
मॅरेथॉन दोन तास नऊ मिनिटात पूर्ण केली होती. पहिल्या मॅरेथॉनपेक्षा तब्बल ५६ मिनिटांनी
वेळ कमी केला होता.
सहा
महिन्याच्या औषधोपचारानंतर डॉक्टरांनी मला संपूर्णपणे तपासले आणि माझी बीपीची गोळी
थांबवली. आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस होता, चक्क ४० एमजीची गोळी सुटली होती. डॉक्टरांनी तेव्हाच मला हे पण सांगितलं
की ही सवय मोडू नको, नियमित व्यायाम कर. डॉक्टरांचे क्लिनिक
सोडतानाच मी शपथ घेतली होती आयुष्यभर व्यायाम करणार आणि हे नवं औषधविरहित आयुष्य
नव्या उमेदीने जगणार.
![]() |
पळण्याच्या विविध स्पर्धांमध्ये साम्राज्य रनिंग ग्रुपचा भरभरून सहभाग |
मला
हे नाही म्हणायचं की माझी गोष्ट जगावेगळी आहे पण मला याचा आनंद आहे की मी ती गोष्ट
घडवली आहे. ही माझी स्वतःची गोष्ट आहे. आज या प्रवासाला जवळजवळ चार वर्ष
पूर्ण होत आहेत, आणि माझा निरोगी आरोग्याचा हा मंत्र जपत
अविरत वाटचाल करण्याकडे मी पाऊले टाकत आहे.
मी
माझी स्वतःची प्रेरणा आहे !!!
![]() |
| सिंहगड ट्रेक आणि टेकडी |
अमोल, खूपच प्रेरणा देणारा लेख आहे.
उत्तर द्याहटवाKeep it up....👍👍👍
🅢 🅐 🅣 🅗 🅔 🅚🅐🅚🅐