- डॉ. शिरीष सुमंत
आषाढाचा मेघ माझ्या
स्वप्नामध्ये आला
आजवरल्या पावसाचे
पैसे मागू लागला... ॥१॥
पौर्णिमेचा
चंद्र माझ्या
अंगणात
आला
आजवरल्या
प्रकाशाचा
हिशोब
सांगू लागला... ॥२॥
माध्यान्हीचा सूर्य अचानक
मनात माझ्या आला
त्याने काही बोलण्याआधी
सूर्यनमस्कार घातला... ॥३॥
जाई
जुई गुलाब मोगरा
चाफा
हळूच हसला
प्रीतीमधल्या
सुगंधाचं
मोल कसलं वदला?... ॥४॥
हिरवी रानं पिवळी शेतं
झाडं डोलू लागली
देणं तुम्ही जाणा आमचं
असं बोलू लागली... ॥५॥
ऊन
पाऊस वारा हवा
निसर्गाचा
ठेवा
हिशोब
यांनी मागितला तर
काय
करायचं बोला?...॥६॥
कितीही प्रगती झाली तरी
मर्यादा माणसा तुला
निसर्गाचं रक्षण वर्धन
हेच तारील तुला!
हेच तारील तुला...!! ॥७॥
फारच सुंदर आहे,खूप आवडली
उत्तर द्याहटवाअगदी खरंय!निसर्गाला जपायलाच हवं!👌
उत्तर द्याहटवा