फुलले रे मन माझे

- सुरेश पांढरीपांडे 

(ज्येष्ठ नागरिक मंचात पदार्पणानंतर २०१५ मध्ये पहिल्या सामूहिक वाढदिवस सोहळ्यात सादर केलेल्या भावना)

(चाल: फुलले रे क्षण माझे)

 

फुलले रे मन माझे फुलले रे. खुलले रे मन माझे खुलले रे,

जेष्ठांच्या, हो जेष्ठांच्या,

जेष्ठांच्या, आशिषाने,

फुलले रे मन माझे फुलले रे, खुलले रे मन माझे खुलले रे ||


झुळूक मैत्रीची आली हि घेउन बंधुभावांचे ठसे,

हृदयात रुजले ते, खोलात श्वासात , चिम्बुनी जावे जसे

ह्या मित्रांचे, ह्या मित्रांचे ऋण मी फेडू कसे

जेष्ठांच्या, हो जेष्ठांच्या,

जेष्ठांच्या, आशिषाने, फुलले रे  || १ ||


ओढ हि, ओढ हि उमजे ना,

सर्वांच्या त्या भेटीविना करमेना,

ह्या कट्ट्याची, ह्या कट्ट्याची धुंदीही जाईचना,

जेष्ठांच्या, हो जेष्ठांच्या, जेष्ठांच्या, आशिषाने, फुलले रे  || २||


ह्या ग्रुपमधील मंडळी, मंडळी,

वडिल आणि बंधूंसम आहे मजसी,

ह्या सर्वांना, ह्या सर्वांना प्रणाम करीतो मी,

जेष्ठांच्या, हो जेष्ठांच्या, जेष्ठांच्या, आशिषाने, फुलले रे  || ३ ||


फुलले रे मन माझे फुलले रे, खुलले रे मन माझे खुलले रे ||



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

देणं कृतज्ञतेचं!

संस्कृत – समज आणि गैरसमज